Police Bharti : राज्यात 17,471 पदांची पोलिस भरती होणार,गृह विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जारी |
Police Bharti 2024:सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी पदभरती निबंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत.
सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशत्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.
वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन
निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक
सूचना निर्गमीत केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने (Computer Programme Based test / Examination) घेण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक त्यानुषंगाने पोलीस
शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरीता वित्त विभागाच्य क्र.१ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतूदींमधून सूट देण्याची तसच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क रोशील टि०५०५ २०२७ रोजीच्या त संतर्भ क २ रोशील
Police Bharti :
पोलीस भरतीस मान्यता
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात १७ हजार पोलीस
शिपायांची पदे भरण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी ही भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबविण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालकांवर सोपविण्यात आली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गतील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पोलीस दलातील घटक प्रमुखांच्या आस्थापनांवरील १७,४७१ पदे रिक्त झाली आहेत. त्यात पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅण्डसमन, सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे.
वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन आदेशानुसार ज्या विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर केले आहेत, अशा विभागांना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरण्यास अनुमती दिली आहे. त्यातून पोलीस भरतीसाठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस शिपायांची शंभर टक्के रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलीस घटक प्रमुख कार्यालयांच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवायची आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी महासंचालाकंवर सोपविण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भात आक्षेप, वाद,
न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास, त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक व संबंधित घटक प्रमुखांची राहणार आहे, असे गृह विभागाने सांगितले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Police Bharti :
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Police Bharti :
अन्य महत्वाच्या भरती
ग्रेजुएट उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! भारतीय आर्मी अंतर्गत ३८१ पदांची भरती सुरु!!
भारतीय रेल्वेत लोको पायलटच्या 5696 जागांसाठी मेगा भरती; १०वी पास उमेदवारांना संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
✅रयत शिक्षण संस्था मध्ये 808 पदांची भरती प्रक्रिया सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित!! !
🆕महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांकरिता मेगा भरती; ५३४७ पदांची भरती!!
✅१२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; होमगार्डची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; १०,२८५ पदांची मेगा भरती!!
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोकरी अपडेट्स इंस्टाग्राम वर :
सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के 17,471 पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत. या आशयाचा नवीन GR गृह विभागाद्वारे जाहीर केला आहे. या GR नुसार, सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. पूर्ण GR खालील लिंक वर उपलब्ध आहे.
सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणविस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. सन 2023 मध्ये नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा प्लान होता. या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्यानं नवीन भरती होईपर्यंत गृह खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट केले होतो. मात्र, या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कंत्राटी भरतीविरोधात संभाजी ब्रिगेडनं मंत्रालयात आंदोलन केल होतो. जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.
नवीन २०२४ परिपत्रक बघा
Police Bharti :
राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात १३ हजार पदांची नवीन पोलिस भरती होणार आहे. त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून राज्यातील १० केंद्रांमधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपेल. तत्पूर्वी, लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलिस भरतीची घोषणा होवू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या ७० वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे.
राज्यातील सद्य:स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलिस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक शहर- जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाची मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते.
गृह विभागाने २३ हजार पोलिसांची भरती केली आहे, तरीदेखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल, असेही सूत्रांनी सांगितले.