Agriculture Scheme :शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळणार एकरी अडीच लाखांचे अनुदान,

   

Agriculture Scheme :

      शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळणार एकरी अडीच लाखांचे अनुदान,

Agriculture Scheme :

भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. महाराष्ट्र देखील एक शेतीप्रधान राज्य म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम आहे.

राज्यातील 50 % जनसंख्या ही शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जात आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी देखील अनुदान दिले  जाते.

 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड अनुदान योजना संपूर्ण देशात राबवली जात आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 31 प्रकारच्या झाडांच्या लागवडीसाठी एकरी अनुदान उपलब्ध होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वृक्ष लागवड अनुदान योजनेअंतर्गत महोगणी, चंदन, चिंच, जांभूळ अशा 31 प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी दोन लाख 56 हजाराचे अनुदान मिळते.

 

यामुळे शेतकरी बांधवांना कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन वृक्ष लागवडीचा सल्ला दिला जातोय. दरम्यान आज आपण महोगनी लागवडी संदर्भात माहिती पाहणार आहोत. महोगनीची झाडे खूपच मौल्यमान समजली जातात.

 

या झाडाच्या प्रत्येक भागाचे एक वेगळे महत्त्व आहे. या झाडाची पाने, बिया, साल, लाकूड इत्यादीना बाजारात मोठी मागणी असते. यामुळे महोगणी झाडाची लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळू शकते. कृषी तज्ञ सांगतात की हे झाड दोनशे फुटांपर्यंत वाढते.

मात्र आपल्या भारतात हे झाड फक्त 60 फूट उंचीपर्यंत वाढू शकते.

 

तज्ञ म्हणतात की ही झाडे 200 फूट उंच वाढू शकतात.

 

पण भारतात ते फक्त 60 फुटांपर्यंत वाढतात. महोगनी लाकडाचा वापर फर्निचर, बोटी, सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे फर्निचर उद्योगात त्याचा वापर वाढत आहे. त्याची किंमतही चांगली मिळते.

बिया आणि फुलांचा उपयोग रक्तदाब, दमा, सर्दी आणि मधुमेहावर औषधी बनवण्यासाठी केला जातो. झाडे रोगांना प्रतिरोधक असतात. एकरी 1500 झाडे लावता येतात. लागवडीनंतर 12-15 वर्षात झाडे उत्पादनक्षम होतात.

 

महोगनी डोंगराळ किंवा अति पावसाळी भागात लावले जात नाही. हे बहुतेक मातीत आणि हवामानात घेतले जाऊ शकते. एकंदरीत शेतकऱ्यांनी एकरी अडीच लाख रुपये अनुदान घेऊन महोगनीची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

Agriculture : यामुळे फर्निचर इंडस्ट्रीमध्ये या लाकडाचा वापर वाढत आहे विशेष म्हणजे या लाकडाला बाजारात चांगला भावही मिळणार या झाडाच्या बियांचा आणि फुलांचा उपयोग औषध बनवण्यासाठी होतो रक्तदान आणि पदव्या सारखे आजारांवर या झाडाच्या पानांचा वापर केला जात असतो विशेष म्हणजे या झाडावर कोणताच रोगरायचा प्रादुर्भाव पाहायला मिळत नसतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top