Agriculture Budget : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

 

 

Agriculture Budget : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Agriculture Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget 2024 ) सरकारने घोषणा केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच तरुणांसाठी आणि महिला वर्गासाठीही अर्थसंकल्पामध्ये मोठ्या योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकविमा पासून ते निर्यातीबाबत अनेक योजनासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे.

 

शेतकऱ्यांसाठी केल्या 10 घोषणा

PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत
पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार
शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देणार
सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार
मत्स्यपालन योजनेला चालना देणार
सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य
सरकार 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार
शेतीसाठी आधुनिक साठवण करणार

या सर्व योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget 2024 ) आखल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही देश प्रथम या भूमिकेवर विश्वास ठेवून वाटचाल करत आहोत. शाश्वत विकासासाठी सर्वांगीण विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. 2014 पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला, हे पाहून यातून धडा घेण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अर्थमंत्र्यांच्या इतर मोठ्या घोषणा

Agriculture Budget :  देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार
सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार
पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार
सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार
पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार

MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू
गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज
रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार
सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

Budget 2024 | टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

Agriculture Budget :

मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2024) 7 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले होते. त्यानंतर 8 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर 9 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 45 हजार, 10 लाख उत्पन्नावर 60 हजार, 12 लाख उत्पन्नावर 90 हजार आणि 15 लाख उत्पन्नावर 1 लाख 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. यावर्षी हा स्लॅब कायम आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.

आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असं त्यांनी सांगितलं.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.

मागील वर्षी दोन प्रणाली लागू केल्या होत्या. त्यात नवीन प्रणाली घेणाऱ्या करदात्यांना सात लाखांपर्यंत कर नाही. परंतु जुनी प्रणाली काय आहे. त्या प्रणालीत विविध सुट दिली जाते. त्यासाठी गुंतवणूक आणि करसवलतीचे पुरावे द्यावे लागतात. म्हणजेच तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top