Cotton Farming : कृषी वैज्ञानिकांनी तयार केले कापसाचे नवीन वाण

 

 

 

 

 

 

Cotton Farming : कृषी वैज्ञानिकांनी तयार केले कापसाचे नवीन वाण

शेतकऱ्यांसाठीआनंदाची बातमी !

कृषी वैज्ञानिकांनी तयार केले कापसाचे नवीन वाण, नवीन जातीच्या विशेषता काय ?

Cotton Farming :

 

कापूस महाराष्ट्र उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची शेती राज्यातील खानदेश विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार सहित मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते. खानदेश मधील जळगाव जिल्ह्याला तर कापसाचे आगार म्हणतात.

याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. अलीकडे मात्र या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

यामुळे आता कापसाची लागवड करण्याऐवजी इतर पर्यायी पिकांचा शोध घेतला जाऊ लागला आहे. दरम्यान राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे कापसाचे एक नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने वैद्यकीय क्षेत्रासाठी खास मेडिकेटेड कापूस वाण तयार केला आहे.

विशेष म्हणजे हा वाण आता व्यावसायिक स्तरावर लागवडीसाठी देखील उपलब्ध आहे.म्हणजे शेतकऱ्यांना या जातीचे कापूस बियाणे लागवडीसाठी मिळणार आहे.

 

 

या वाणाची विशेषता म्हणजे कापसाचा या वाणाची पाणी शोषणक्षमता सर्वसामान्य वाणापेक्षा 25% अधिक आहे. या कापसाची वेचणी झाल्यानंतर यावर प्रक्रिया केली जाते आणि यानंतर मग हा कापूस विक्रीसाठी बाजारात दाखल होतो.

Cotton Farming :

 

Teacher : शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी किती पदे?

 

या कापसाला बाजारात चांगला भाव मिळतो.हा कापूस इतर जातीच्या तुलनेत अधिक पांढरा असतो. हे आखूड धागा कापसाचे वाण असते.

हा वाण कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त राहणार आहे. लागवडीनंतर साधारणता 120 ते 140 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते.

या जातीची सघन पद्धतीने लागवड केली तर हेक्‍टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top