Cotton Market :
कापसाचे भाव पुन्हा कधी वाढतील ? कापसाचे भाव 200 रुपयांपर्यंत नरमले? पुढं कसं होणार ?
Cotton Market
Jalna News : कापसाच्या भावात मागील आठवड्यात नरमाई दिसून आली. अनेक बाजारात कापसाचा सरासरी भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी कमी झालेला दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. कापसाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले? पुन्हा वाढतील की नाही? ही चिंता शेतकऱ्यांना आहे. पण सध्या कापसाचे भाव कमी होण्यामागे प्रामुख्याने तीन कारणं आहेत.
पावत्या सह
Cotton Market
कापसाचा भाव मागील आठवडाभरात कमी झाले. सरासरी भावपातळी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांवरून सध्या ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर कमाल भावही नरमलेला दिसतो. गुजरात आणि महाराष्ट्रातील कमाल भाव ८ हजार २०० रुपयांवरून १०० रुपयांनी कमी झाला. तर कापसाचा भाव सध्या हमीभावादरम्यान आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कापसाचा भाव क्विंटलामागं २०० ते ३०० रुपयांनी कमी झाला.
कापसाच्या भावातील चढ उताराची चर्चा बाजारात आधीच सुरु होती. याचं मुख्य कारण आहे मार्च एन्डचे. मार्च एन्डमुळे आपले खाते नवं जूनं करण्यासाठी व्यापारी आणि उद्योग व्यवहार कमी करतात किंवा बंद करतात. मिळालेल्या ऑर्डर्स तर पूर्ण करण्याच लागतात. पण दरवर्षी ही स्थिती आपल्याला दिसून येत असते. दुसरं कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेले चढ उतार. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. केवळ वायदेच नाही तर प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भावही काहीसा नरमला. याचा परिणाम आपल्याला देशातील बाजारावर दिसून येतो.
एप्रिलमध्ये कापूस, सूत आणि कापडाचा उठाव पूर्वीच्या पातळीवर येऊ शकतो. त्यामुळे कापसाच्या भावातील नरमाई थांबून भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भावपातळी पुन्हा आधीच्या पातळीवर पोहचू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.