Jarange Patil :
मनोज जरांगे पाटलांनी टाकला नवा डाव; लोकसभेबाबत अंतरवालीमधून सर्वात मोठी घोषणा
Jarange Patil :
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
सराटी अंतर्वली बैठक संपूर्ण व्हिडिओ माहिती लिंक मध्ये
Jarange Patil :
जालना, : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये आला आहे. या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
गव्हाला मिळतोय चांगला बाजार भाव
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आपला विषय लोकसभेचा नाही तर राज्यातील आहे. आरक्षण देण्याचं काम राज्याच्या हातात आहे. कमीत कमी आठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. पण आपला विषय केंद्रात नाही, राज्यात आहे. मग त्याचवेळेस समिकरण बदलू शकतं. आपण जर लोकसभेला एकाचवेळी इतके फॉर्म भरले तर समाज अडचणीत येऊ शकतो. मतदानाचं विभाजन होईल. त्याला एक पर्याय करा, अपक्ष म्हणून फक्त एकानेच एका जिल्ह्यात फाॅम भरा. मात्र तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
अंतरवाली सराटीतून मराठा समाजाचा मोठा निर्णय, पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या.
अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे. या बैठकीला आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर का नाही आरक्षणाबाबत निर्णय घेतला?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मरेपर्यंत मी समाजाच्या बाजूनं उभं राहणार. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत. तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही,’ असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.