MARATHA RESERVATION : “ओबीसी नेते कोर्टात गेले तर ?”

 

 

 

 

 MARATHA RESERVATION:

 

ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगालाच चॅलेंज करेल, मनोज जरांगे यांचा प्रतिहल्ला.

maratha reservation issue  : राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. या जीआरला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ओबीसी नेते घेत आहे. ओबीसी नेते या जीआर बाबत हायकोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेल, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले.

 

सागर सुरवसे, दि.29 जानेवारी 2024 | राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरुन संघर्ष सुरु झाला आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगे सोयरे यांनाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ओबीसी नेते एकटवले आहेत. ओबीसींनी याविरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी घेतला. तसेच राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईल, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केले. यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष रस्त्यावर तसेच न्यायालयात रंगणार आहे.

 

काय म्हणाले मनोज जरांगे.

 

 MARATHA RESERVATION:

 

राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. या जीआरला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ओबीसी नेते घेत आहे. ओबीसी नेते या जीआर बाबत हायकोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेल. त्यांना जे काही करायचे ते करू द्या, मी पण मला जे करायचे ते करतो. असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील आज रायगडवर शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यापूर्वी त्यांनी हा इशारा दिला.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

 

 

नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र

 

 MARATHA RESERVATION:

 

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुटले नाही. नारायण राणे यांनी आरक्षणाच्या जीआरबाबत आपण समाधानी नाही. माझी भूमिका वेगळी आहे. सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी, मराठा असा संघर्ष होणार आहे, असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, ते एकटेच आहे जे मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बसले आहे.

 MARATHA RESERVATION:

 

ओबीसीप्रमाणे मराठ्यांनी एकत्र या

 

ओबीसी आपल्याविरोधात एकत्र येत आहेत. ते जीआरविरोधात हरकत घेण्यासाठी बैठक घेत आहेत. आता राज्यभरातील मराठ्यांनी एकत्र यावे. मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे समाजात दुही दाखवू नका. आता मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. माझा शब्द आहे की एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

 

Manoj Jarange | नोटीसला मनोज जरांगेंचं उत्तर

 

न्यायालय आम्हालाही न्याय देईल. न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. आमचेही वकील कोर्टात जातील. काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे. त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल. त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही, असं जरांगे म्हणाले.

न्याय मंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला. आमची बाजू आम्ही मांडू, आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

विरोधाला विरोध करायचं असं नाही. पण माणुसकीने वागायला पाहिजे. आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. मोर्चा काढण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. त्यामुळे ते देखील काढू शकतात, असं जरांगे म्हणालेत.

 

 MARATHA RESERVATION:

 

“मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?” अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध राहिला आहे. “मराठा समाजातील विनोद पाटील यांच्यासारखी विद्वान माणस बोलली असती, तर मी समजू शकतो. पण मनोज जरांगे पाटील काय बोलतात, यावर पत्रकारांना टीआरपी मिळू शकतो” अशा शब्दात गुणरत्ने सदावर्ते यांनी हल्लाबोल केला.

ओपन, ओबीसी, भावांच्या जागा मी कमी होऊ देणाकर नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. कुणासोबत गैर होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. चुलत भावाला प्रमाणपत्र हवं असेल, तर प्रतिज्ञापत्र देण्याची कायद्यात तरतूद आहे. उच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर जे प्रतिबंध घातलेत ते पाळावे लागतात, कोण कितीही मोठा असला तरी? जरांगे पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन केलय” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top