Pocra :
‘पोखरा’चा आधार: 24 हजार शेतकऱ्यांनी घेतला तुषार सिंचनाचा लाभ! शेततळे, ठिबक- तुषार, शेडनेट – पॉली हाऊससह विहीरीला 80% अनुदान..
दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा आणि पाणीपातळीत होत असलेली घट याचे गांभीर्य पाहता शेतकरीही पुर्वनियोजन करुन शेती व्यावसायावर भर देऊ लागला आहे. 2018 ते जून 2024 पर्यंत लातूर जिल्ह्यातील 282 गावांचा Pocra योजनेत समावेश होता. या दरम्यानच्या काळात 49 हजार 473 शेतकऱ्यांनी या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेतला आहे. मात्र, पसंती दिली आहे ती तुषार सिंचनाला..
Pocra :
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत पोखरा योजना राबवली जात आहे.
सुरुवातीच्या काळात राज्यातील 15 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये लातूर जिल्ह्याचा देखील समावेश झालेला आहे. मधूमक्षिका पालनापासून वेगवेगळ्या 22 घटकांचा यामध्ये समावेश आहे अधिकच्या अनुदानावर योजनेचा लाभ ही पोखराची खरी ओळख राहिलेली आहे.
त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील 49 हजार 473 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ तर घेतलाच पण याकरिता तब्बल 143 कोटी 88 लाख 97 हजार रुपये सरकारने खर्ची केलेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी 60 हजार 624 जणांनी नोंदणी केली होती. यापैकी 58 हजार 951 अर्जांना पुर्वसंमती देण्यात आली तर 49 हजार 473 शेतकरी हे लाभार्थी ठरलेले आहेत.
Pocra :
उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
ठिंबक सिंचन, फळबाग लागवड, बिजोत्पादन, तुषारसिंचन, पंपसंच यासारखे घटक अनुदानावर घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे जून 2024 पर्यंत योजनेचा पहिला टप्पा पार करणे कृषी विभागाला अनिवार्य असणार आहे.
पूर्वसंमती मिळूनही जिल्हयातील 236 प्रकरणे ही प्रलंबित राहिलेली आहेत शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणी यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम अडकलेली आहे.
असे ठरतात लाभार्थी..
पोखरा योजनचे वेगवेगळे टप्पे शासनाने ठरवून दिले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 282 गावातील शेतकरी हे पहिल्या टप्प्यात लाभार्थी ठरले आहेत. 2 हेक्टरपर्यंत लाभ घेतल्यास 75 टक्के अनुदान तर 2 ते 5 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरील लाभार्थी असतील तर 65 टक्के अनुदान हे ठरवून देण्यात आले आहे.
सिंचनावर शेतकऱ्यांचा भर शेतीक्षेत्र सिंचनाखाली येईल त्याच अनुषंगाने शेतकरीही योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
Pocra :
प्रकल्पासंबंधी व विविध घटकांबाबत अधिक माहितीसाठी 9355056066 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा..
ठिबक सिंचनाचा लाभ 6 हजार 530 शेतकऱ्यांनी घेतला असून याकरिता 48 कोटी 8 लाख रुपये अनुदनावर अदा करावे लागले आहेत. तुषार सिंचनासाठी 24 हजार 640 शेतकरी पात्र झाले होते. यावर शासनाने 47 कोटी 71 लाख रुपये खर्ची केले आहेत.
पोखरा अंतर्गत येणाऱ्या गावांची यादी पहा :-
Pocra योजनेत मंजुरी आणि अनुदानाचा थेट लाभ यामुळे शेतकऱ्यांचा ओढा होता. पहिला टप्पा जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. काही शेतकऱ्यांची प्रलंबित राहिलेली प्रकरणे ही मार्चपर्यंत निकाली काढली जाणार आहेत. पोखरामुळे सिंचनाचे घटक शेतकऱ्यांकडे वाढले आहेत.
– दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर..
कोणत्या शेती योजनांसाठी मिळतो लाभ क्लिक करा :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Pocra)
शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी या पोर्टल मार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी एक प्रधानमंत्री ठिबक व तुषार सिंचन योजना ही राबवली आहे यामध्ये प्रत्येक अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ठिबक व तुषार सिंचनासाठी 55% अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबवते त्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर शेतकरी मित्रांनो खालील दिलेली माहिती वाचून तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा केला जातो तसेच या योजनेसाठी पात्रता व कागदपत्रे कोणती लागतात व या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते हे तुम्ही खालील माहिती सविस्तर पणे वाचू शकता.
अधिक माहिती साठी येथे पहा
ठिबक व तुषार सिंचन योजना अनुदान Pocra
शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान हे दोन प्रकारांमध्ये दिले जाते त्यामधील पहिलं म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी अनुदान म्हणजेच की यामध्ये अशे शेतकरी येतात की ज्यांच्याकडे जमीन अगदी थोडी आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना अनुदान हे 55% इतके दिले जाते म्हणजेच की जर शेतकऱ्यांनी 10 हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन खरेदी केले असेल तर त्यावर त्याला 55 टक्के म्हणजेच साडेपाच हजार रुपये हे अनुदान स्वरूपात दिले जाईल.
यानंतर दुसऱ्या प्रकारांमध्ये बाकी उरलेले इतर शेतकरी येतात ज्यांना अनुदान हे 45 टक्के दिले जाते त्यामुळे एकंदरीत सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ठिबक व तुषार सिंचन योजना पात्रता
सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे.
यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ सातबारा उतारा ८अ असणे गरजेचे आहे तो तुम्ही डिजिटल पद्धतीने देखील काढू शकता काढण्यासाठी
Kruishi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कास्ट मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे
यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे पाच हेक्टर पेक्षा कमी असायला पाहिजे.
यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरवेल,विहीर,शेततळे किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा व त्याची नोंद तुमच्या सातबारा उतारा वरती असायला हवी जर नोंद सातबाऱ्यावरती नसेल तर तुम्ही ती नोंद जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता जर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रात पाण्याचा साठा असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल