Teacher: शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी किती पदे? जाणून घ्या सविस्तर…
Teacher :
शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यमनिहाय जागांमध्ये सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी असल्याचे दिसून येत आहे
राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या जाहिराती शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खासगी अनुदानित शाळांतील पदांचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६७८ जागांवर शिक्षक भरती केली जाणार आहे.
प्रतीक्षा संपली… शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध! सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये
Teacher भरती 2024 अपडेट:
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग शिक्षण विभाग
भरतीचे नाव Teacher भरती 2024
एकूण रिक्त पदे 21678
ठिकाण महाराष्ट्र…
- राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि Teacher पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांच्या एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मीडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव, खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाच्या विविध विषयांवरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून, त्यात तंत्रज्ञानाचादेखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यांवर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे, असेही मांढरे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी येथे पहा.
भरतीच्या प्रक्रियेतील आकडेवारी
१,६३,०५८ प्रमाणित अर्ज
७,८७० प्राधान्यक्रम दिलेले
:गटनिहाय रिक्त पदे
पहिली ते पाचवी – १०२४०
सहावी ते आठवी – ८,१२७
नववी ते दहावी – २,१७६
अकरावी ते |बारावी – १,१३५
माध्यमनिहाय रिक्त पदे
मराठी – १८,३७३
इंग्रजी – 939
उर्दू – १,८५०
हिंदी – ४१०
गुजराथी – १२
कन्नड – ८८
तमीळ – ०८
बंगाली – ०४
तेलगू – ०२
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
:रिक्त जागांचा तपशील
जिल्हा परिषद ३४ – १२,५२२
महापालिका – १८ – २,९५१
नगरपालिका – ८२ – ४७७
खासगी १,१२३
शैक्षणिक संस्था – ५,७२८
Teacher : महत्त्वाच्या सूचना
प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘यूजर मॅन्युअल दिले आहे.
उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी
उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी ८ आणि ९ फेब्रुवारी
प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल.